एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न; संजय शिरसाटांचा आरोप

Sanjay Shirsat : जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात?, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे : शिरसाट

मुंबई : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनी केला आहे. तर, जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात?, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे. शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्याला आपला सपोर्ट होतोय की काय असं चित्र निर्माण होतंय, असे जरांगेंबद्दल बोलतांना शिरसाट म्हणाले. 

पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की,"सरकार काम करतंय, मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती काम करत नाही का? करतंय, पथक तेलंगाणाला जाऊन देखील आले. नोंदी कोणी काढल्या? याच सरकारनं काढल्या आहेत. तलाठ्यापासून सर्व यंत्रणा काम करतंय, तुम्ही याला काम म्हणणार नाही का?, मुळात आपली मागणी काय? सरकारनं त्यासंदर्भात काम सुरु केलंय ना? , नंतर ज्या मागण्या येतायत त्यामुळे कामाचा ट्रॅक चेंज होत आहे. मग सरकारला काम करणं अवघड होतं, असे शिरसाट म्हणाले. 

फेब्रुवारीत आरक्षण मिळणार असल्याने मुंबई आंदोलन कशासाठी?

तसेच, इतिहासात पहिलियांदाच असं झालंय मुख्यमंत्र्यांसोबत सगळे जरांगेंना भेटले आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे सरकार काम करतंय.  मराठा समाजाला देखील याची जाणीव आहे. कुणालाही दुखवता कामा नये अशी सरकारची भूमिका आहे. फेब्रुवारीत सरकार अधिवेशन घेत आरक्षण जाहीर देखील करणार आहे. मग कशाला पाहिजे हे (मुंबई आंदोलन) सगळं, असे जरांगे म्हणाले. जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात? सरकार तुमच्याशी बोलायला तयार असल्याचे शिरसाट म्हणाले. 

जरांगेंनी संजय राऊतांचे तोंड शेकले पाहिजे

दरम्यान, शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. "तो शेण खाल्लेलं माणूस बोलला काहीतरी, जरांगेंना प्यादं समजता का वैगेर बोलला. जरांगेंनी त्याचं तोंड शेकले पाहिजे. अडीच वर्ष त्यांनी काही केलेलं नाही आणि जरांगेंना प्यादं म्हणता, असे शिरसाट म्हणाले.

लाखो मराठे मुंबईकडे निघाले...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे आज सकाळीच आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात लाखो मराठे देखील पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. तर, मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Embed widget