एक्स्प्लोर

Gadchiroli : 'आम्ही तिघे म्हणजे विकासाचा त्रिशूळ', गडचिरोलीत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

Gadchiroli : अजित पवारांच्या सत्तेतील सहभागानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं देखील सांगितलं.

Gadchiroli :  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी (8 जुलै) रोजी गडचिरोलीतील पहिल्याच जाहीर कर्यक्रमात  सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिघांची एकत्रित शक्ती भविष्यात राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे.  

गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोलीतील ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली. 

या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी सहज संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं. तर अजित पवार यांनी ही त्यांच्या प्रशासनावरील नियंत्रणाची झलक दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. या तिघांनी सरकारमध्ये सर्व काही ठीक असल्याचं देखील सांगण्यात येत होतं. 

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दोघांवर जोरदार टीका केली. जेव्हा कष्टकरी आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय होतो, तेव्हा अजित पवारांसारखा प्रसंग घडतो असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेल्यांचे काय करायचे हे अजित पवार यांना कळतं. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले.अजित पवार तुमच्या नावात जीत आहे. त्यामुळे चिंता नको आपला विजय निश्चित आहे.  असल्याचे सूतोवाच ही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या एकत्रित शक्तीला शंकराच्या त्रिशूळाची उपमा दिली आहे. तसेच शंकराच्या तिसऱ्या डोळ्याची उपमा देत तिघे त्रिशूळ म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच जे सामान्य जनतेचा छळ करतील  विनाशासाठी आम्ही शंकराचा तिसरा डोळा ही होणार असल्याचे फडणवीसांनी म्हटलं. 

तर याच कार्यक्रमात अजित पवारांनी त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत आहे याची झलक दाखवली. गडचिरोली मधील अधिकाऱ्यांना गडचिरोलीत राहून जनतेचे काम करण्याची तंबी अजित पवारांनी यावेळी दिली आहे. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, तेव्हा मंत्रालयातील सचिवांनी देखील इथे हजर राहायला हवं. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : 

Gadchiroli : नवीन सत्ता समीकरणानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री एकत्र गडचिरोली दौऱ्यावर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget