एक्स्प्लोर

मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकले, मुख्यमंत्री म्हणाले, अॅक्शनला रेअॅक्शन येणारच !

उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर ठाण्यात मनसेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल रात्री (10 ऑगस्ट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळं ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसून आलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला. त्याच ॲक्शनला आज रिअॅक्शन दिल्याचे आज पाहायला मिळालं, परंतू, असं आंदोलन कोणालाच अपेक्षीत नसते असंही मुख्यमंत्री म्हणाले.  

सरकार स्थापन झाल्यावर विरोधक म्हणाले हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार पडणार आहे. परंतू, असं झालं नाही. सरकार अधिक मजबूत होत गेलं. आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. सत्तेसाठी कुठलंही कॉम्प्रमाईज आम्ही विचारांशी करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असं ते म्हणाले. 

मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकरेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहेत ते पाहावं. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो असे मुख्यमंत्री म्हणाले. हे लोक आम्हाला दिल्लीतलं सांगतात. आधी दिल्लीतली लोकं मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो. आम्ही कुठलंही काम लपून-छपून करत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही दिल्लीला जात नाही अस मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं

आता अनेक लोक बोलत फिरत आहेत की, मला मुख्यमंत्री करा. पण आम्ही तसं कधीच केलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आजही ते ठाण्यातून दाढी बद्दल बोलले. परंतू, त्यांना दाढीची धास्ती आहे.  त्यांना माहिती आहे याच दाढीने आपली गाडी खड्ड्यात घातलेली आहे. मिमिक्री करणं हेच काम त्यांना आता उरलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी अशा प्रकारचं काम केलं असतं तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

ठाण्यातील राड्यानंतर कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल; मनसैनिकांचा पोलीस स्थानकात जल्लोष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावाMVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रि‍पदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget