एक्स्प्लोर
शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
बीड : शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडल्याचा आरोप करणाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे बुद्धीभेद करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बीडच्या परळीमध्ये आज रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यूपीए सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा राज्य सरकार दुप्पट ते तिप्पट कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे काही लोक बुद्धीभेद करतील, कोणाला किती मदत मिळणार. पण त्यांना सांगू इच्छितो की, सगळ्यात आधी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अल्पकर्जधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. ''काही राजकीय पक्ष मुद्दाम या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी प्रयत्न करत होते. पण हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. जोपर्यंत सत्तेत आहोत, तोपर्यंत शेतकरी आणि शेतमजूर वंचितांसाठी काम करत आहोत.''
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालाच उल्लेख करुन, गेल्या अडीच ते तीन वर्षात मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि संपकरी शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद समोर आले आहेत. तर नाशिकमधील किसान क्रांतीनेही शेतकरी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये आज कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उद्या राज्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता नाशिक बाजार समितीत ही बैठक होणार आहे.
संबंधित बातम्या
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement