एक्स्प्लोर

वाघ-सिंहाची जोडी एकत्र आल्यावर कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही : मुख्यमंत्री

आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. सत्ता आल्यानंतर ठरवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन्ही पक्ष एकच आहेत अशी भावना ठेवून निवडणुकांना सामोरे जाऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. आम्हाला सत्ता पदांकरिता नको आहे तर लोकांच्या सेवेसाठी हवीय. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद हे गौण आहे, असे प्रतिपादन  देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख  मोठे बंधू असा केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाणार की नाही? यावरून चर्चा झाली. हा प्रश्न मला निमंत्रण देताना उद्धवजींना पडला नाही आणि आमंत्रण स्वीकारताना माझ्याही मनात आला नाही, असेही ते म्हणाले. राज्याचा मुख्यमंत्री कोण? आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य या कार्यक्रमाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धवजींचं प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घ्यायला आलोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.  ही युती महाराष्ट्रात आणि भारतात सर्वात जास्त काळ चाललेली युती आहे. घरात दोन भाऊ एकत्र राहतात त्यावेळी ताणतणाव होतोच. अनेकांची इच्छा होती की तणाव जावा आणि एकत्र यावं. आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, असे ते म्हणाले. वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. वाघ सिंह एकत्र आल्यावर जनता कुणाला कौल देणार हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, युतीच्या यशाचे शिल्पकार शिवसेनेचे सैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. मला शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात जाताना दुसरीकडे जातोय असे वाटत नाही, आपल्या घरी येतोय असेच वाटते. आपण सगळे भगव्यासाठी लढणारे लोक आहोत असे ते म्हणाले. माझा गुरु हा भगवा ध्वज आहे. आपण व्यापक हिंदुत्वाने प्रेरित आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकीसाठी आम्ही एकत्र आलेलो नाही तर देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी एकत्र आलोय. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भूतो न भविष्यती विजय मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले. मुख्यमंत्री कोण ह्या चर्चा माध्यमाला करू द्या, माध्यमाला रोज एक प्रश्न लागतो. शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, आपल्याला प्रचंड बहुमताने आपलं सरकार आणू. आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. सत्ता आल्यानंतर ठरवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन्ही पक्ष एकच आहेत अशी भावना ठेवून निवडणुकांना सामोरे जाऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget