एक्स्प्लोर
कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांसोबत दिल्ली दरबारी
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन झालेली कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना मंत्र्यांसह दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन कर्जमाफीविषयी प्रस्ताव मांडणार आहेत.
शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, तर भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांसोबत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषी मंत्री पांडुरुंग फुंडकर यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
दरम्यान कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री, विधान परिषद सभापती, विधान सभा अध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सर्व पक्षीय गटनेते , विरोधी पक्ष नेते यांची बैठक झाली. दिल्लीला जाऊन आल्यानंतर तिथल्या बैठकीचा वृत्तांत सांगावा, त्यानंतर भूमिका ठरवू, असं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीत सांगितलं.
कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला होता. शिवाय दोन दिवसात केंद्राला भेट द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिवसेना मंत्र्यांसह अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement