एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरीतील तरूणांनी बनवलं भन्नाट अॅप, ऑफलाईन लेक्चर ते गृहपाठ देण्यापर्यंतची सोय!
ग्रामीण भागात सध्या इंटरनेट सुविधा, पालकांकडे अद्ययावत मोबाईल नसणे यासारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागत आहेरत्नागिरीतील दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी तयार केलेलं अॅप अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देताना दिसून येत आहे.
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकार, पालक, शाळा, क्लासेस यांची पसंती ही ऑनलाईन शिक्षणाला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये हाच यामागील उद्देश. पण, ग्रामीण भागात सध्या इंटरनेट सुविधा, पालकांकडे अद्ययावत मोबाईल नसणे यासारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडालेला पाहायाला मिळत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण, गृहपाठ या साऱ्या समस्या देखील आल्याच. पण, रत्नागिरीतील दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी तयार केलेलं अॅप या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसून येत आहे.
प्राथमिक शिक्षण आपल्या कोकणातील मुळगावी, त्यानंतर मुंबई- पुणे असा प्रवास अमेरिकेत इंजिनिअरिंग पूर्ण केलेले दोन मित्र देशात असलेली ऑनलाईन पद्धत आणि त्यामध्ये येत असलेल्या समस्या यांचा विचार करत त्यांनी क्लेवर ग्राऊंड ( clever ground ) हे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अडथळा येणार नाही, याबाबत सारी खबरदारी घेतल्याची माहिती या अॅपचा निर्माता सिद्धार्थ पात्रे देतो.
'अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्या ठिकाणची ऑनलाईन शिक्षण पद्धत आणि आपल्या देशातील शिक्षण पद्धत यामध्ये बराच फरक दिसून आला. विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भविष्याचा विचार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मी अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय घेतला. साऱ्या परिस्थितीचा विचार करत क्लेव्हर ग्राऊंड हे अॅप तयार केले. त्याला सध्या प्रतिसाद देखील चांगला मिळत असल्याचं सिद्धार्थ सांगतो. तर, यावर आम्ही थांबणार नाही. या अॅपच्या माध्यामातून आमचे भविष्यात इतर देखील काही प्लॅन्स आहेत. करिअर गाईडन्सपासून इतर देखील पर्याय आम्ही या अॅप्सच्या माध्यमातून देणार असल्याची प्रतिक्रिया सौरभ सुर्वे यानं दिली. लोकल फॉर व्होकल, मेक इन इंडिया या उपक्रमाचा आम्हाला फायदा नक्कीच होईल. शिवाय, आपल्या माणसांकरता काहीतरी करता येत असल्याचं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया या दोन्ही तरूणांनी दिली.
काय वेगळेपण आहे या अॅप्सचं?
ऑनलाईन शिक्षणासाठी अगदी झूमपासून अनेक अॅप्स गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण, इंटरनेट अभावी विद्यार्थ्यांंच्या शिक्षणात अडथळे येत आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांना झालेलं लेक्चर पुन्हा पाहत शंका निरसन करणं देखील कठीण आहे. अशा वेळी हे अॅप्स नक्कीच फायदेशीर ठरतं. या अॅप्समध्ये इंटरनेट समस्या असल्यास विद्यार्थी लेक्चर डाऊनलोड करून ऑफलाईन पाहू शकतो. विद्यार्थ्यानं लेक्चर किती वेळा पाहिलं? हे देखील शिक्षकांना कळतं. लेक्चर रेकॉर्ड करत विद्यार्थ्यांना पाठवता देखील येते. मुलांना नोट्स पाठवणे, गृहपाठ पाठवून ते तपासणे. ऑनलाईन एमसीक्यू अर्थात योग्य पर्याय निवडा प्रश्न देखील या माध्यमातून घेता येतात. हे प्रश्न आपोआप चेक होत त्याचे मार्क्स पालक आणि विद्यार्थ्यांना देखील कळतात. शिवाय, ऑनलाईन अॅडमिशनचा विचार करत प्रवेश प्रक्रिया, हजेरी, प्रगतीपुस्तक इत्यादी गोष्टी देखील ऑनलाईन पाहता येतात. सध्या या राज्यभरातून या अॅपला प्रतिसाद वाढत असल्याचे अॅपचे निर्माते सांगतात.
वापरकर्त्यांचा कसा आहे अनुभव?
रत्नागिरी शहरातील क्लासेसमध्ये हे अॅप सध्या वापरले जात आहे. इतर अॅपच्या तुलनेत हे अॅप नक्कीच फायदेशीर आणि वेगळे आहे. यामध्ये ऑफलाईन लेक्चर डाऊनलोड करणं, विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे यासारख्या गोष्टींचा सध्या फायदा होत असल्याची प्रतिक्रिया अभिषेक इंदुलकर या शिक्षकानं दिली. तर, घरी बसून देखील साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आमचा अभ्यास हा विना अडथळा सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
सुरक्षेचं काय?
ऑनलाईन शिक्षण घेत असताना सध्या वापरात असलेल्या काही अॅप्सच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्व उपस्थित केले गेले. पण, क्लेव्हर ग्राऊंड हे अॅप पूर्णता सुरक्षित आहे. कोणत्याही संस्थेनं, शाळा किंवा क्लासेसनं हे अॅप वापरण्याकरता सुरूवात केल्यानंतर विद्यार्थी आणि सदस्यांना ईमेल आयडी आणि पासवर्ड दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हे अॅप सुरक्षित असल्याचं अॅप निर्मात्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement