एक्स्प्लोर
Advertisement
अधिकाऱ्यावर चिखल फेकणं नितेश राणेंना महागात, न्यायालयाकडून 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
अधिकाऱ्यावर चिखल फेकणं आमदार नितेश राणे यांना चांगलंच महागात पडलं आहे. नितेश यांना पोलिसांनी आज कणकवली न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : अधिकाऱ्यावर चिखल फेकणं आमदार नितेश राणे यांना चांगलंच महागात पडलं आहे. नितेश यांना पोलिसांनी आज कणकवली न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यासह एकूण 18 जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्ग उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल ओतला होता. त्यानंतर रात्री नितेश आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले. आज (शुक्रवार) त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हिडीओ पाहा
मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून ठेवलं. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखलमारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या.
अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी नितेश राणेंना अटक | एबीपी माझा
तसेच संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.
वाचा : नितेश राणेंनी केलेली चिखलफेक चुकीची, नारायण राणेंचा माफीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement