एक्स्प्लोर
दहापैकी नऊ महापालिकांमध्ये भाजपची मुसंडी
मुंबई : राज्यातील दहा महापालिकांपैकी नऊ महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाणे वगळता उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती महापालिकांमध्ये भाजप सत्तेजवळ पोहोचली आहे. तर मुंबईत भाजपची सत्तेसाठी चुरस आहे.
मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये टफ फाईट
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. तर 81 जागांसह भाजपही सत्तेसाठी जोरदार फाईट देत आहे. मुंबईत काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 तर इतरांच्या खात्यात 14 जागा गेल्या आहेत. त्यामुळे 227 जागांचा मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
ठाण्यात शिवसेना मोठा पक्ष
ठाणे महापालिकेत मात्र शिवसेना 51 जागांसह मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. 131 जागांच्या महापालिकेतील119 जागांचा निकाल हाती आला आहे. महापालिकेतील 66 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेला 26 जागांची आवश्यता आहे. शिवसेनेला 51 जागा मिळाल्या असून 17 जागा भाजपला यश मिळालं आहे. याशिवाय 26 जागांस राष्ट्रवादी ठाण्यात दोन क्रमांकाचा पक्ष ठरत आहे. काँग्रेसचा फक्त दोन जागांवर विजय झाला अजून मनसेचं इंजिन अजूनही सुरु झालं नसल्याचं दिसतं.
उल्हासनगरमध्येही भाजपची मुसंडी
उल्हानगरमध्ये सर्व जागांचे निकाल घोषित झाला आहे. इथेही 32 जागांसह भाजप मोठा ठरला आहे. तर शिवसेनेला 25 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस फक्त 1, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या असून इतरांच्या खात्यात 16 जागा जमा झाल्या आहेत. 78 जागांच्या महापालिकेत 40 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप टीम ओमी कलानींची साथ घेण्याची शक्यता आहे.
पुण्यात राष्ट्रवादीला धक्का, भाजप बहुमताजवळ
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 162 जागांच्या पुणे महापालिकेतील 158 जागांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप बहुमताजवळ पोहोचला आहे. तर राष्ट्रवादीला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत. पुणे महापालिकेत भाजप 77, शिवसेना, 10, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 44, मनसे 6 आणि इतरांना 5 जागांवर यश मिळालं आहे.
पिंपरी चिंचवड भाजपला घवघवीत यश
पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजप मोठा पक्ष ठरत आहे. 128 जागांपैरी 102 जागांचा निकाल हाती आला आहे. भाजपला आतापर्यंत 38 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादीला केवळ 19 जागाच मिळाल्या आहेत. याशिवाय शिवसेनाही इथे फारशी कमाल करु शकली नाही. सहा जागांवर शिवसेनेला यश मिळालं. तर काँग्रेस आणि मनसेला खातंही उघडता आलं नाही.
सोलापूरमध्ये पहिल्यांदाच कमळ
सोलापूर महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुललं. भाजपला एकहाती सत्तेसाठी केवळ पाच जागाच कमी पडल्या. भाजपला 46 जागा मिळाल्या असून 21 जागांसह शिवसेना दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला 14 जागा तर राष्ट्रवादीला 4 जागांवरच यश मिळवता आलं आहे. तर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेला इथे भोपळीही फोडता आलेला नाही.
नाशिकमध्ये मनसेला धक्का
नाशिककरांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पूर्णत: नाकारलं. 122 जागांपैकी 109 जागांचा निकाल आला आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिककरांनी 55 जागांसह भाजपला कौल दिला आहे. तर 35 जागा मिळवत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नाशिकमधील कामांचं प्रेझेंटेशन देणाऱ्या राज ठाकरेंना इथे मोठा धक्का बसला आहे. इतरांपेक्षाही मनसेला कमी जागा मिळाल्या आहेत. मनसेच्या केवळ 3 जागा मिळवता आल्या.
नागपुरात भाजपला एकहाती सत्ता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. 151 जागांच्या नागपूर महापालिकेत भाजपला बहुमतापेक्षाही 82 जागा मिळाल्या आहेत आहे. 114 जागांचे निकाल आले असून त्यामध्ये भाजपला इथे एकहाती सत्ता मिळाली आहे. तर शिवसेनेला खातंही उघडता आलेलं नाही. काँग्रेसला 32 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली आहे.
अकोल्यात निर्भेळ यश
अकोला महापालिकेतही भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. 80 जागांच्या महापालिकेत भाजपला तब्बल 48 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना 8, काँग्रेस 13, राष्ट्रवादी 5, इतरांना 6 जागांवर समाधान मानावं लागलं.
अमरावतीत भाजप मोठा पक्ष
अमरावती महापालिकेत 40 जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. 87 जागांच्या महापालिच्या आतापर्यंत आलेल्या निकालात शिवसेना 4, काँग्रेस 12 आणि इतरांना 16 जागा मिळवता आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement