एक्स्प्लोर

वाशिममधील नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून भारलं 'लॉकडाऊन गार्डन'

वाशिममधील ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी लॉकडाऊनमधील फावल्या वेळात बाजूच्या परिसरात लॉकडाऊन गार्डन उभारलं आहे.

वाशिम : 2020 या वर्षामध्ये भारतात कोरोना विषाणू दाखल झाला आणि सगळ्याची धाकधूक वाढली. मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. अनेकांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून घरात कोंडून रहाव लागलं. मात्र शासनाने या काळात काही वेळासाठी शिथिलता दिली होती. याच वेळेचा सदुपयोग करत वाशीमच्या ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी स्त्युत्य उपक्रम राबविला. नागरिकांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळे त्यांचं सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे.

वाशिममधील नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून भारलं 'लॉकडाऊन गार्डन

वाशीमच्या ड्रीमलेन्ड सिटीमध्ये 1600 स्क्वेअर फुट जागेवर येथील रहवासी नारिकांनी लॉकडाऊन गार्डन उभारलं आहे. या गार्डनच्या नावातच सर्वकाही आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या फावल्या वेळात ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी हा अनोखा उपक्रम राबवला. परंतु, सर्व नागरिकांनी हे गार्डन उभारताना शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं अनेक निर्बंध लावण्यात आले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन सतत प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत होतं. पण घरात कोंडून तरी किती राहणार, त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळात सर्व नियमांचं पालन करत ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या जागेवर बाग उभारली. नागरिकांनी श्रमदान केलंचं पण त्याचसोबत नागरिकांनी आर्थिक मदतीचाही हात पुढे केला. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात मोठं लॉकडाऊन गार्डन उभं करणं सहज शक्य झालं.

वाशिममधील नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून भारलं 'लॉकडाऊन गार्डन

कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सर्वचजण घरांमध्ये कोंडले गेलो. लहान मुलांसाठी हा काळ तर अत्यंत वाईट होता. शाळा बंद झाल्या, तर घराबाहेर पडणं, बागडणंही बंद झालं. मात्र कॉलनीतील नागरिकांनी केलेल्या सकारात्मक विचारामुळे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी हक्काचं गार्डन उभारलं गेलं.

लॉकडाऊनच्या फावल्या वेळात काही महाभागांनी रस्त्यावर फिरणं पसंद केलं मात्र त्याचा परिणाम म्हणून पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. तर काहींच घरातून काम सुरु होतं. अनेकांनी नियम मोडले. मात्र वाशीमच्या ड्रिमलॅन्ड सिटीने दाखवलेला एकोपा आणि सकारात्मकता पुढच्या काही काळात सकारात्मक उर्जा देणारी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलंUddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget