'रुरल जुगाड स्पर्धेत' मराठवाड्याच्या पोरानं मारली बाजी; अक्षय देशातून पहिला, शेतमाल वाहतुकीसाठी भन्नाट जुगाड
ग्रामीण आविष्कारांना आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत सामाजिक प्रभाव निर्माण करू शकेल अशा कल्पना, उत्पादन असलेल्या स्टार्टअप्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Aurangabad News Updates: सीआयआय यंग इंडिअन्स संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या ‘रुरल जुगाड स्पर्धेत’ ( Rural Jugad Competition )मॅजिकच्या जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट या स्टार्टअप्सने पहिले पारितोषिक पटकावले आहे. ग्रामीण आविष्कारांना आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत सामाजिक प्रभाव निर्माण करू शकेल अशा कल्पना, उत्पादन असलेल्या स्टार्टअप्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विविध समस्यांचे निराकरण करणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना निवडून, नेटवर्किंगद्वारे त्यांना उप्तादन विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी सीआयआयने यंग इंडिअन्स संस्थेच्या देशपातळीवरील 52 केंद्रांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता सहभाग आमंत्रित केलं होतं. यामध्ये मॅजिकचे दोन स्टार्टअप्स यंग इंडिअन्स-औरंगाबाद केंद्राच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ग्रासरूट इनोव्हेशनवर काम करणारे या दोन्ही स्टार्टअप्सनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार औरंगाबाद येथील मॅजिक संस्थेत इन्क्युबेट होत असलेल्या असलेल्या अक्षय चव्हाण या नवउद्योजकाच्या ‘जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट कंपनी’ने पटकावला आहे. अक्षय यांनी ‘सेल्फ ड्राइव्ह हेवी ड्युटी ट्रेलर’ने ट्रॅक्टर आणि ट्रॉली याची क्षमता वाढणारे उत्पादन विकसित केले असून, या उत्पादनाचा मोठा फायदा शेतमाल वाहतुकीदरम्यान होणार आहे. सध्या वापरात असलेल्या वाहनांमध्ये जास्त भारामुळे इंधनाचा वापर जास्त होतो तसेच वाहतूक प्रक्रियेला वेळ लागतो.
दुहेरी ट्रेलर वाहून नेणे असुरक्षित आहे आणि अपघाताची शक्यता
दुहेरी ट्रेलर वाहून नेणे असुरक्षित आहे आणि अपघाताची शक्यता वाढवतात. घाट रस्त्यावर चालवणे धोकादायक आहे आणि जास्त भार खेचल्यामुळे देखभाल खर्च वाढतो तसेच दुप्पट लांबीच्या आकारामुळे रस्त्यावर वाहन चालवणे नेहमीच कठीण असते. यावर उपाय म्हणून अक्षयने स्वतः विकसित केले 12 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स आणि अतिरिक्त ब्रेक चेंबर ट्रॅक्टर हायड्रॉलिक जोडला, मोठ्या आकाराच्या ट्रॉलीमुळे माल वाहन क्षमता 25 टन वाढून 35-40 टन होणार आहे. तसेच वाहन क्षमतेमध्ये सुधार होऊन ट्रॅक्टरची 40% पर्यंत इंधनाची बचत होणार आहे.
मॅजिकचे संचालक सुनील रायथत्ता म्हणाले कि ग्रामीण भागातून येणाऱ्या स्टार्टअप्सना या स्पर्धेतून मोठे व्यासपीठ मिळवण्याची, तसेच आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या पुरस्काराबद्दल बोलतांना अक्षय म्हणाला कि, शेती उपयोगी उत्पादन विकसित करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतुकीसाठी येणाऱ्या समस्या याबद्दल ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडणारा उत्पादन विकसित केला. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल असे मत त्यांनी मांडले. या संपूर्ण प्रवासात मॅजिकने उत्पादन विकसित करण्यासाठी मोलाची मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई
मुले पळवणारी टोळी समजून दोघांना मारहाण, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला