एक्स्प्लोर

सावधान! थर्टी फर्स्टसाठी पनवेलला जाताय, हे जरुर वाचा

नाताळ आणि थर्टी फर्स्ट अशा साधारण आठवड्याभराच्या काळात पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क असून, पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आणि अपेक्षित गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवणार आहेत.

पनवेल : नाताळ (Christmas2020) आणि नव्या वर्षाच्या स्वगतासाठी ग्रामीण भाग, विशेषत: पर्यटन स्थळांकडे येणारे लोंढे पाहता आता येथेही (Coronavirus) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या शहरांप्रमाणंच रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येण्याची चिन्हं आहेत. इतकंच नव्हे, तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल तालुक्यात होणारी गर्दी पाहता यावरही पोलीस यंत्रणांची करडी नजर असणार आहे. 31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टला नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतून नजीकच असणाऱ्या पनवेलच्या दिशेनं अनेकांचाच रोख असतो. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं इथं येणाऱ्यांची गर्दी कायमच जास्त असते. त्यातही नववर्ष, ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तर इथं गर्दी होणार हे नक्की. शहरांतून इथं येणाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील विविध फार्महाऊसना पसंती दिली जाते. यामध्ये काही सेलिब्रिटींच्याही फार्महाऊसचा समावेश आहे. या भागात जवळपास 400 ते 500 फार्महाऊस असल्यामुळं पोलिसांनी 31 डिसेंबरच्या धर्तीवर या भागात चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागांत असणाऱ्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेतलं जाणार आहे. 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन - तीन दिवसांआधीपासूनच या भागात होणारी वर्दळ पाहता सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर असेल. पोलीस म्हणतात, है तैयार हम.... नव्या वर्षाच्या स्वगतासाठी या भागात शहरांतून अनेकजण जमतात. पनवेलच्या हद्दीत अनेक फार्महाऊस असल्यामुळं शहरी भागांतून इथं येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोविड परिस्थितीनुळं जे निर्बंध शासनानं आखले आहेत त्या अनुषंगानं त्या नियमांचं पालन करायचं आहे असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी तयार आहे. थर्टी फर्स्टच्या धर्तीवर या भागातील फार्महाऊस मालकांशी आपल्या बैठका झाल्या असून, त्यांनाही सर्व निर्बंध आणि नियमांसंबंधीच्या सूचना देण्यात येणार असल्याचं पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं यंदाचा थर्टीफस्ट हा पोलिसांच्या नजरेतच जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Embed widget