एक्स्प्लोर
भावकीच्या वादातून विहिरीत फेकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
पिंपरी- चिंचवड : चाकणमध्ये भावकीतला वाद एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. एका इसमाने चुलत भावाच्या दीड महिन्यांच्या मुलाला विहिरीत फेकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
चाकणच्या खालूब्रे गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. चाकण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपी शिवाजी नामदेव बोत्रे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
दर्शन अजित बोत्रे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव होतं. जमिनीच्या वादातून दर्शनचे पिता अजित आणि शिवाजी या चुलत भावांमध्ये वाद सुरु होता. त्याच रागातून शिवाजीने दर्शनला आईच्या हातातून हिसकावून घेतलं आणि काल पावणे पाच वाजता विहिरीत फेकलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement