एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Uddhav Thackeray Serum Institute visit | मुख्यमंत्री ठाकरे आज सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

Uddhav Thackeray Serum Institute visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 जानेवारी) दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागल्याचं स्पष्ट झालं. मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूटचा हा नवीन प्लांट आहे. "मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरु होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत," असं राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपेंनी सांगितलं की, "कोरोना लस निर्मिती जिथे होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे लसीचं कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे."

आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार. प्रतिक पाष्टे - डेक्कन, पुणे महेंद्र इंगळे - नऱ्हे, पुणे रमा शंकर हरिजन - यूपी बिपीन सरोज - यूपी सुशील कुमार पांडे - बिहार

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात अदर पुनावालांचं ट्वीट, म्हणाले...

काय म्हणाले होते अदर पुनावाला? 

दरम्यान आगीनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार. या आगीत जीवितहानी झालेली नाही, तसंच सुदैवाने कुणीही गंभीर जखमीही झालेलं नाही. या घटनेत काही मजल्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे."

मुख्यमंत्री काय म्हणाले होते? सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. ठराज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Serum Institute fire: सीरम इन्स्टिट्यूटला आग.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ दखल, अजित पवार पुण्याकडे रवाना

कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित - उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझवण्याच्या आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करु इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे."

Serum Institute Fire : केंद्रीय तपास यंत्रणेनं आगीचा अहवाल मागवला

आगीचा कोणताही परिणाम कोव्हिशिल्डवर नाही

कोविशील्ड' लसीचे उत्पादन सुरु असलेली इमारत सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत असून आगीवर नियंत्रण मिळवलं. ज्या ठिकाणी आग लागली तिथं कोरोना लस बनत नाही तर बीसीजी लस बनते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget