CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर 12 नोव्हेंबरला सकाळी 7.30 वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावला होता. त्यामुळे ते मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तीन दिवस अॅडमिट होण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होते. आता त्यांच्यावर 12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. यानंतर तीन दिवस त्यांनी रुग्णालयातच विश्रांती घेतली आहे. मात्र त्यानंतर आता उद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला सकाळी 7.30 वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी 8.45 वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं. यानंतर ते रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखभाली खाली होते . मात्र आता ते घरी जाऊन आराम करू शकतात असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री घरी परतण्याची शक्यता आहे. यानंतर मुख्यमंत्री हे घरातच काही दिवस आराम करतील.
काय झालं होतं मुख्यमंत्र्यांना?
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडांची झीज होत असते. त्याला सर्वायकल स्पाँडिलॉसिस असं म्हणतात. यातील सर्वायकल या शब्दाचा अर्थ 'मानेसंबंधी' असा आहे. मणक्यातील चकत्यांची झिज झाल्यामुळे वेदना होतात, या स्थितीला स्पाँडिलॉसिस असं म्हणतात. काही ठिकाणी याचा उच्चार स्पाँडिलिसिस असाही केल्याचं दिसून येतं. याचाच मुख्यमंत्र्यांना काही दिवसंपासून त्रास होत होता. अन् यावर आता शस्त्रक्रिया झाली आहे.
कोणी केली होती शस्त्रक्रिया?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी एच.एन. रिलायन्स रुग्णालयात झाली. डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले होते. डॉ. अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
संबंधित बातम्या :
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha