Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
Maharashtra chief minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
Maharashtra chief minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री HN रिलायन्स रग्णालयात दाखल झाले होते. आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरु झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकानं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशश्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटरमध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरची शस्त्रक्रीया यशस्वी, मुख्यमंत्री मानेच्या आजाराने होते त्रस्त,
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) November 12, 2021
एच एन रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रीया @CMOMaharashtra
हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता
दरम्यान यंदा देखील हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा देखील देशात आणि राज्यात अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. सोबतच मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेतलं जाईल असं बोललं जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी देखील करण्यात आली आहे. मात्र आता अधिवेशन नागपुरात होतं की मुंबईत याकडे लक्ष लागून आहे.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. पुढील दोन ते तीन दिवस मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.