CM Uddhav Thackeray : राज्यपाल, मद्यराष्ट्राचा विरोध ते दाऊदबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? जाणून घ्या भाषणातील 10 मुद्दे
जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार आज विधानसभेत घेतला. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. जाणून घेऊया त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे
1- राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका,
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक आहे. देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत गुंतलाय. आपला तो बाब्या..असं वागू नका, चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाही, मी जन्मानं मुंबईकर, मला याचा अभिमान आहे. रावणाची जीव बेंबीत, तसा काही जणांचा मुंबईत आहे. असं वक्तव्य करत मुख्यमंत्री ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे,
2-राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती ,
राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती आहे, विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालाकडे जातात असं मुख्यमंत्री म्हणाले. एखादी तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
3-कोरोना काळातील शिवभोजन
सरकारच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात शिवभोजन सुरू केलं. दहा रुपयात जेवण देतो हे मोठं काम आहे. आजपर्यंत 8 कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला, ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर 500 कोटी तरतूद केली आहे. त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल. काही झालं तरी भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे आरसा बघितला तरी भ्रष्टाचार करतात. पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे.
4-आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?
दाऊद आहे कुठे?आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? मग तो दाऊद आहे कुठं हे कुणालाच माहिती नाही. दाऊदला आम्ही फरफडत आणू असं म्हटलं होतं, ओसामाला मारलं तसं दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, देशद्रोहाच्या विरोधात आम्ही आहोतच, त्यात दुमत नाही.
5-पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते.
6-कुटुंबियांना बदनाम करण्याची विकृती
आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. एकमेकांच्या कुंटुंबियांच्या आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. अरे जर मर्द असशील तर मर्दासारखं अंगावर ये, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. तुम्ही जे माझ्या कुटुंबियांला बदनामी करायचे चाळे केले आहेत. तुम्हाला सत्ता पाहिजे ना मग मी तुमच्या सोबत येतो, मला तुरुंगात टाका. आम्ही तुमच्या कुटुंबियांच्या बदनामी केली नाही. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवले ते त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार?
7-आज अघोषित आणीबाणी सुरू
नितीन गडकरी म्हणाले वाल्याचा वाल्मिकी होतो. आता भाजपने ह्युमन लॉंड्रिग सुरु केलं आहे. पण हे सगळं कुणाला माहिती नाही असं काही समजू नका. हा महाराष्ट्र आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती, आज अघोषित आणीबाणी सुरू आहे.
8-नवाब मलिाकांचा राजीनामा मागतायत, पण...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग तो पाच वेळी निवडूण येतोय, मंत्री होतोय तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजलं नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसता थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करतायत का?"एखाद्याला बदनामी करताना कोणत्या थराला जायचं याचा विचार करा असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.
9-देवेंद्रजी तुम्ही 'रॉ'मध्ये हवं होतं
देवेंद्रजी तुम्ही रॉ, सीबीआयमध्ये जायला हवंत, तुम्ही ती माहिती त्यांना दिली. त्यांचं काम वेगाने होईल. ईडी आहे की घरगडी आहे तेच समजत नाही
10-मेहबूबा मुफ्तींचा त्यावेळी अफजल गुरूला फाशी देण्यास विरोध
अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्या मुफ्तीसोबत सत्तेत भाजप बसले. तुम्ही मलिकांचा राजीनामा मागतांय आणि तिकडे तुम्ही मुफ्तीसोबत गेलात. मेहबूबा मुफ्तींनी त्यावेळी अपजल गुरूला फाशी देण्यास विरोध केला होता.अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाट मांडला होता. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या, विचार तेच आहे.
11-धारावी वाचवली याचं कौतुक तुम्हाला का नाही?
वाटाघाटी करून आम्ही किंमती कमी करून वस्तू कोविडमध्ये खरेदी केल्या. धारावीत १० बाय १० मध्ये लोक राहतात, कुठलं सोशल डिस्टंसिंग होतं? आम्ही धारावी वाचवली याचं कौतुक तुम्हाला का नाही? केंद्रीय पथक म्हणायचं, साहब कुछ भी करो, धारावी बचाव..
12-मुदस्सिर लांबे फडणवीस यांना हार घालतानाचे फोटो जगजाहीर
मुदस्सिर लांबे फडणवीस यांना हार घालतानाचे फोटो जगजाहीर आहेत. फोटो दाखवून आरोप करणं योग्य नाही. मुदस्सिर लांबेची नियुक्ती माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे,त्यावेळेस अफजल सरकार होतं का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
महत्वाच्या बातम्या :
MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?
MLA Houses In Mumbai : "आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर..." जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला