शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nagpur news update : मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
नागपूर : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवाण्याचा प्रयत्न करेन. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या विकासाचा वेग मंदावला होता. मात्र आता परत विकासाचा वेग पकडेल. शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते.
"या पूर्वी अनेक सत्कार झाले, पण हा सत्कार माझ्यासाठी आनंदाचा आणि खूप मोठा आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. या वाटचालीत मला मराठा समाजाची साथ आणि प्रेम लाभले आहे. अनेक प्रसंग आले, परंतु, मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, अशा भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, "अनंत अडचणीवर मात करत इथवर पोहचलो. ज्यांना ज्यांना आवश्यकता भासली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. याचा अभिमान आणि समाधान आहे. राजकारणात विश्वास महत्वाचा आहे. 50 आमदार आणि 13 खासदारांनी माझ्यावर विश्वास टाकला ही मझयासाठी अभिमानाची बाब आहे. दिलेले शब्द पाळणारा आहे. त्यामुळेच सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला. सर्वांच्या विश्वासाने सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन केले.
मुख्यमंत्री भाऊक
आजवर झालेल्या माझ्या इतर सत्कारांपेक्षा आजचा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे, असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊक झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. "मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या अडीच वर्षात न्यायालयात डेडीकेटत यंत्रणा तयार करण्यात आली नव्हती. आज मुधोजी राजे यांनी मराठा समाजाच्या 12 मागण्याचे निवेदन दिले. नागपूरकर म्हणून आणि एक वकील म्हणून आपली वकिली मी मुख्यमंत्री कडे करेल, असे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या