महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती, पण हिंदीचाही अभिमान, दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री
Devendra Fadnavis : या महाराष्ट्रात सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठी. मराठी शिकावीच लागेल. त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Devendra Fadnavis : या महाराष्ट्रात सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठी. मराठी शिकावीच लागेल. त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. भारतातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषाला विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही. समिती स्थापन केली आहे, कोणाच्याही दबाबावाल बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलून दाखवला. पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता केली.
पहिलीपासून 12 वी पर्यंत मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी सक्तीची करा हे उद्धव ठाकरेंच्या समितीनं सांगितलं
तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिलात. पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. बीबीडी चाळेत आम्ही त्याला घर दिले. धारावीमधील गरिब माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. आपण जे केले त्याच्याचविरुद्ध बोलायच आणि जिंकलो असं सांगायचं असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला. नवीन शैक्षणिक धोरणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारने जी समिती स्थापन केली होती, त्या समितीने पहिलीपासून 12 वी पर्यंत मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी सक्तीची करा हे उद्धव ठाकरेंच्या समितीने सांगितलं.
महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करणारे आम्ही आहोत
कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे, याच्यासाठी राजकारण करणार आम्ही नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करणारे आम्ही आहोत असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, युवांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, राज्याच 16 लाख कोटींचे करार करुन राज्याला प्रथम क्रमांकावर आणल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. गरिब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्हीला पाणी पोहोचवायचं आहे असे फडणवीस म्हणाले. दुष्काळाला आम्हाला भूतकाळ करायचे आहे. 2014 नंतर जे बोललो ते आम्ही करुन दाखवलो आहे. आम्ही बोलबच्चन देणारे नाहीत. भाषण मोठ मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य असे आमचे काम नाही. ये पब्लिक सब जाणती है असे फडणवीस म्हणाले.
महायुतीचे तिनही पक्ष नवीन महाराष्ट्र घडवायला निघालो आहोत. मोदीजी तुमचे जे स्वप्न आहे विकसीत भारत करण्याचे त्याबरोबर विकसीत महाराष्ट्र करण्याचे स्वप्न देखील पूर्ण करु, महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य केल्याशिवाय राहणार नाही असे फडणवीस म्हणाले.
आमचं नातं हिंदुत्वाचं
मंत्री रविंद्र चव्हाण यांची आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. आपण संघटनपर्व पूर्ण करत नव्या प्रदेशाध्यक्षाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व प्रदेशाध्यक्ष बघा कोणीही रक्ताचे नाहीत. आमचं नातं हिंदुत्वाचं आहे, विचारांचं आहे असे फडणवीस म्हणाले. इथे देशाचा देखील प्रमुख होऊ शकतो आणि चहा विकणारा देखील पंतप्रधान होऊ करतो. रविंद्र चव्हाण नगरसेवक झाले, महामंत्री झाले, आमदार झालेत, मंत्री झालेत. रविंद्र चव्हाण धाडसी आहेत, चिकाटीचे आहेत असे फडणवीस म्हणाले. एक तरी कोकणी प्रदेशाध्यक्ष झाला पाहिजे, आता ती कमतरता देखील चव्हाण यांनी भरुन काढली आहे असे फडणवीस म्हणाले. दिलेली जबाबदारी पूर्ण करणं, क्षणोक्षणी भाजपचा विचार करणं, 24/7 भाजपसाठी वाहणारे चव्हाण आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचे देखील अभिनंदन करेल, पायाला भिंगरी लावत पक्ष उभं करण्याचे काम त्यांनी केल्याचे फडणवीस म्हणाले. आपण फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हनं उत्तर दिलं. भाजप 135 जागांवर निवडून आला, त्यामुळे बावनकुळे यांचे अभिनंदन. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. मोदीजींनी वैश्विक नेतृत्व तयार केलं आहे. या देशात गेल्या 11 वर्षात मोदीजींनी परिवर्तन आणलं आहे. 25 कोटी गरीबांना बाहेर आणण्याचे काम केल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Ravindra Chavan : देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अन् RSS च्या मर्जीतले रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, मुंबईत घोषणा
























