Manoj Jarange : केस पांढरे होऊन उपयोग काय, कसं बोलायचं हेच कळत नसेल तर; भुजबळांच्या भाषणावर जरांगे पाटलांच चोख प्रत्युत्तर
छगन भुजबळांच्या आरोपांवर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचे केस पांढरे होऊन उपोयग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल त्यांना आकस असले, असं जरांगे पाटलांनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर : 'वय झाल्यामुळे भुजबळ असं बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल.' असं म्हणत जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) हिंगोलीतील भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) भाषणावर प्रत्युत्तर दिलं आहे. हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेतून (OBC Sabha) छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांची चांगलाच समाचार घेतला. मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत, असं भुजबळांनी म्हटलं बोलताना म्हटलं होतं.
तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही, असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. सध्या राज्यात सुरु असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. तसेच भुजबळ आणि जरांगे पाटलांकडून एकमेकांवर वयक्तिक पातळीवर देखील टीका होत असल्याचं चित्र आहे.
कशाला केस पांढरे केलेत, जरांगे पाटलांचा थेट सवाल - जरांगे पाटील
भुजबळांना काहीच माहित नाही, मग कशाला केस पांढरे केलेत, असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. भुजबळांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय. भुजबळांची आंदोलनं ही अशीच असतात वाटतं, ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेले मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नाहीत. भुजबळांचे केस पांढरे झालेत, पण त्याचा काहीच उपयोग नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
जालन्यातील लोकांना अटक का केली? जरांगेंचा सवाल
बेदरे प्रकरणावर देखील मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिलंय. तो हल्ला आता झाला होता का? त्या गोळ्या पोलिसांनी झाडल्या होत्या. बायकांना सुद्धा गोळ्या लागल्या. उलट माझा प्रश्न आहे की, जालन्यातील लोकांना अटक का केली असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय.
'त्यांच्या सभेला दंगल सभा नाव द्यावं लागेल'
हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेला दंगल सभा असं नाव द्यायला हवं, असं म्हणत जरांगे पाटलांनी ओबीसी सभेवर टीकास्त्र सोडलं.
मी माझ्या समाजासाठी काहीही करायला तयार - जरांगे पाटील
माझे पाय तोडायला येत असतील तर या मी वाट बघतोय. माझे पाय तोडायला तरी याल, मी माझ्या समाजासाठी काहीही करायला तयार आहे. पण मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, असा निश्चय जरांगे पाटलांनी यावेळी बोलून दाखवला.