एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chhagan Bhujbal : मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत; भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांच्याकडून ओबीसी मेळाव्यात जरांगे यांच्यावर टीका करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हिंगोली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (OBC Sabha) सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा समाचार घेतला आहे. "आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझ्या आई वडील देखील म्हातारे असतील. पण डोक्याचे जेवढे केस पिकले आहे, तेवढे आंदोलन केले आहे. दोन्ही बाजूने अडचणीत आणले जात आहे. एकीकडे कुणबी आरक्षण द्या हे सुरू आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आणि ओबीसींचं आरक्षण (OBC Reservation) काढून घ्या म्हणत आहे,असे भुजबळ म्हणाले.

तर, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करतो. त्याच्या 15 सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केले खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहे. आम्ही कधी एक टायर जाळला का? त्यांनीचं पेटवले, असेही भुजबळ म्हणाले. 

भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका देखील करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आदरांजली अर्पण

"काल 25 नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिदिन झाला. याच दिवशी कसाबने मुंबईवर हल्ला केला. यात अनेकांनी आपला जीव गमावला. तसेच आज संविधान दिवस असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तुम्हाला लिहण्याचं, बोलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे या सर्वांना आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे म्हणत," भुजबळ यांनी आदरांजली वाहिली.

कोण काय म्हणाले? 

ओबीसींना विरोध करणाऱ्यांचे हातपाय तोडू : बबनराव तायवाडे

मागील तीन महिन्यापासून राज्यात दोन समाजात संघर्ष सुरू आहे. ओबीसींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही संघर्ष करतोय. मंडळ आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला फॅारवर्ड कास्ट म्हटलंय. एकाही आयोगाच्या अहवालात मराठा मागास असल्याचे सांगितले नाही.  ओबीसींनी आमचं 70 वर्षापासून चोरलं असल्याचं म्हटलं जातं. पण कुठे चोरलं. आतापर्यंत सात अहवाल झाले पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचे सांगितले गेले नाही. हे आमची लायकी काढत आहे, आमची लायकी काढणारे हे कोण आहे. आमची लायकी नाही तर, मग आमच्या पंक्तीत कशाला येऊ लागले आहे. यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. यापुढे ओबीसींच्या विरोधात कोणी बोलल्यास त्यांचे हातपाय कापून ठेवू. तसेच मनोज जरांगे यांचं जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख आम्हाला बनवत आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही: लक्ष्मणराव गायकवाड 

मंडल आयोगाचे घर जाळत होते, ते आज ओबीसीमध्ये का येत आहे. भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका. पुढच्या वर्षी मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही. इडा पिडा टळू दे ओबीसीचा राज्य येऊ दे, एक मराठा लाख मराठा एक मराठा गरीब मराठा करु,...मी गरीब मराठा याना सांगू इच्छितो 100 जीसीबीने फुल वाहण्यापेक्षा जरांगे यांना पैसे द्या आणि ज्यामुळे त्याचा संसार सुखी होईल, असे लक्ष्मणराव गायकवाड म्हणाले. 

अन्यथा आम्ही हातात दंडुके घेऊ: टी पी मुंडे 

आमचे घर पेटवून देण्यासाठी कोणी येत असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जाणीवपूर्वक आम्हाला खवळू नका. ऊस तोड कामगारांच्या हातात ऊस तोडताना काय असते हे जाणून घ्यावे, आपल्याला कोणी धक्का द्यायला आला तर त्याला उंच पाडा, तुम्ही दंडलशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हातात दंडुके घेऊ, चिलत्या जरांग्या कुवत काय तुझी, तमाशे नाचवत फिरले आणि जमिनी विकल्या. पोलीस बहिणीला तुम्ही दगडाने मारतात, असे टी पी मुंडे म्हणाले. 

आम्ही कमांडर आहोत: महादेव जानकर

छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इथे मुख्यमंत्री म्हणून आला असता. छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. ओबीसीने ठरवलं तर खासदार किंवा आमदार होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती लढायच्या नाही. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांनी पार्टी काढली म्हणून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण, महाराष्ट्र कोण चालवतंय? कुणाच्या मागे तिकीट मागतो,  भुजबळ साहेब कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना यायचं ते येईल. भुजबळ साहेब पुढच्या वेळेस दलीत आणि मुस्लीम यांना सोबत घेतलं पाहिजे.  भुजबळ साहेब तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत. त्यांच्यासोबत युती करणार नाही. पैशाला कमी नाही. 100 वंजाऱ्याला सांगेल, 1 कोटी रुपये द्या, जमा होतील. भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे महादेव जानकर म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Hingoli OBC Sabha : भुजबळांची तोफ पुन्हा धडाडणार, हिंगोलीतील आजच्या सभेतून कोणावर निशाणा साधणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget