Chhatrapati Sambhajinagar Crime: सावधान! लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर करते म्हणून महिलेने उकळले पैसे, महिलेवर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime: लाडकी बहीणसह विविध योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या महिलेवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhjinagar: लाडकी बहिणसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देतो असे सांगत निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना म्हस्के असे या महिलेचे नाव असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हातमाळीमधील ही रहिवासी आहे.
शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार महिलांसह गरीब महिलांकडून पैसे उकळत लूट केल्याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे उकळत केली फसवणूक
शासनाने महिलांसाठी काढलेल्या लाडकी बहिण योजनेसह राजीव गांधी निराधार, श्रावणबाळ अशा सरकारी योजनांचा लाभ मंजूर करून देते या महिलेने महिलांचे पैसे उकळत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार महिलांनी छत्रपती संभाजीनगरचे तहसिलदार रमेश मुणलोड यांनी महिलांचा जबाब घेत पैसे घेण्यााऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
लाडकी बहीण योजनेचे नाव घेत केली फसवणूक
सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ही एक जुलैपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी राज्यातील महिलांनी शासकीय कार्यालयात रांगा लावल्याचे चित्र होते. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगत फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत असून छत्रपती संभाजीनगरमधून शासकीय योजनांचा लाभ मंजूर करून देते असं सांगत पैसे उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जातील.
पात्र महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज मंजूर झाल्यावर आधार लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत केली जाईल
...तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही
दरम्यान, सुरुवातीला कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची सांगितले होते. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, जर तुमच्याकडे हा दाखल नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ज उपलब्ध आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा