एक्स्प्लोर

नामांतराविरोधात 37 हजारांवर आक्षेप अन् समर्थनात 153 प्रस्ताव दाखल; आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटचे सात दिवस

Chhatrapati Sambhaji Nagar : राज्य शासनाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला.

Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या 35 वर्षांपूर्वीपासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान केंद्र सरकराने मंजुरी दिल्यावर राज्य शासनाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याचवेळी या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले आहे. त्यामुळे नामांतराला विरोध करण्यासाठी आक्षेप, हरकतींची संख्या वाढत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतराच्या निर्णयावर 37 हजारांवर आक्षेप, हरकती घेण्यात आल्या आहेत. तर समर्थनात 153  प्रस्ताव दाखल झाले असल्याची बातमी 'सकाळ'ने दिली आहे.  

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून, औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. पुढे हा प्रस्ताव केंद्रकाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर केंद्राने या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्राची मंजुरी मिळताच राज्य शासनाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले आहे. 

आवक-जावक विभागात आक्षेपांचा पाऊस

27 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शासनाच्या पुढील आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अधिसूचनेनंतर अनेक नागरिकांनी आक्षेप दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागात आक्षेपांचा पाऊसच पडत आहे. आजपर्यंत जवळपास छत्रपती संभाजीनगर नामांतरावर 26  हजार 336  आक्षेप तर धाराशिवच्या नामांतरावर 11  हजार आक्षेप दाखल झाले आहेत. तर नामांतराला समर्थन देणारे 153  प्रस्ताव दाखल झालेले आहेत. 27 मार्च पर्यंत आक्षेप दाखल करून घेतले जाणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दोन्ही बाजूने आक्षेप दाखल होतायत...

दरम्यान, 27 मार्चपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या असल्याने, दोन्ही बाजूने अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत आहे. नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे यासाठी शहरातील चौका-चौकात कॅम्प देखील लावण्यात येत आहे. तसेच वेगवेगळ्या बैठका घेऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन देखील केले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून 'औरंगाबाद' फ्लेक्सची तोडफोड; पोलिसांत गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad : ⁠निवडणूक जाहीर, जागावाटप रखडलं? मविआत मुंबईच्या जागांवरुन राडा? ABP MAJHAEknath Shinde On Vidhan Sabha Election : दोन वर्षात केलेल्या कामची पोचपावती जनता आम्हाला देईल- शिंदेHeadlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Embed widget