एक्स्प्लोर

कार्यकर्त्यांनी मुंबईत येण्याची घाई करु नये, भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन

कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात अगोदर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशा कार्यक्रमाचा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र असा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजि करण्यात आला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. छगन भुजबळांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भायखळा भाजी मंडई येथे उपस्थित रहावे, छगन भुजबळ सर्वांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिल्याचा हा मेसेज होता. मात्र असं काहीही नसल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. भुजबळ साहेब भेटण्यासाठी नंतर वेळ देतील, मात्र आत्ताच घाई करु नये, असं भुजबळ कुटुंबीयांनी म्हटलं आहे. सोमवारपासून पुन्हा मैदानात सोमवारपासून छगन भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. काही दिवसांवर आलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका, आगामी विधानसभा आणि लोकसभांची रणधुमाळी या पार्श्वभूमीवर भुजबळांना मिळालेल्या जामिनावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित बातम्या :

छगन भुजबळ : तेव्हा आणि आता

PHOTO : सोमवारपासून मैदानात, भुजबळांचा नवा अवतार सर्वात अगोदर एबीपी माझावर

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget