एक्स्प्लोर

भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे

महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिलीप कांबळे बोलत होते.

पुणे: "छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते जेलबाहेर आले पाहिजेत", असं धक्कादायक वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते. महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिलीप कांबळे बोलत होते. दिलीप कांबळे म्हणाले, “ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाल्याने आता छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते कायद्याच्या कचाट्यात अडकले, मात्र लवकरच ते जेलबाहेर येतील”. भुजबळांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला. एकीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी प्रचंड पाठपुरावा करुन, भुजबळांबाबतची प्रकरण बाहेर काढली, त्याबाबत विविध तक्रारी करुन, भुजबळांना अटक झाली. मात्र त्यांचाच मंत्री आता भुजबळ बाहेर यायला हवेत असं म्हणत असल्याने, सोमय्यांनाच ही चपराक म्हणावी लागेल. दरम्यान, समता परिषदेकडून दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ विचारवंत मा.गो.माळी यांना देण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं. यावेळी केंद्र सरकारमधील मंत्री उपेंद्रसिंह कुशवाह आणि राज्य सरकारमधील मंत्री दिलीप कांबळे हे दोन भाजप नेतेही उपस्थित होते. दिलीप कांबळे हे इथले स्थानिक आमदार असून त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये फुले वाडा आहे. भुजबळांना नेमकं कोणत्या प्रकरणात अटक - सविस्तर बातमी इन्फोर्समेंट डिरोक्टरेट म्हणजे अंमलबजावणी संचलनालयाने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटक केली आहे. ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे. http://polldaddy.com/poll/9884689/ संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Dhananjay Munde : ‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget