एक्स्प्लोर

धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय

राज्यभरातील मंदिरांकडे जो निधी जमा झाला आहे, त्या निधीतून सामूहिक विवाह करण्यात येणार आहे.

मुंबई: राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. लहरी हवामानामुळे शेती पिकत नाही, पिकली तर तुटपुंजा भाव मिळतो. या पैशात जगणं मुश्किल असताना, मुलींची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकरी आणि गरीब कुटुंबांना असतो. यावर राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी नामी उपाय काढला आहे. राज्यभरातील मंदिरांकडे जो निधी जमा झाला आहे, त्या निधीतून सामूहिक विवाह करण्यात येणार आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतून राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत.

वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याशिवाय शेतमजुर किंवा गरीब कुटुंबातील परिस्थितीही सारखीच आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिणा, पैसा, दागिने जमा होतात. हा पैसा आता बाहेर काढण्याचा निर्णय धर्मदाय आयुक्तांनी घेतला आहे. हा पैसा शेतकरी, गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी वापरण्यात येईल. त्यासाठी राज्यभरात सामूहिक विवाह सोहळे घेण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातील धार्मिक संस्थाची समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून हे विवाह होणार आहे. 11 एप्रिल रोजी पहिला सामूहिक विवाह सोहळा पंढरपूरला होणार आहे.

या सामूहिक विवाहात तरुणींना मंगळसूत्र, घरातल्या आवश्यक वस्तू, भांडी देण्यात येणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या विवाहात अक्षता वाटप होणार नाही. अक्षता म्हणून टाकलेलं आणि वाया गेलेलं तांदूळ हे अनेकांची भूक भागवू शकतं. त्यामुळे केवळ मंचावर उपस्थित असलेल्यांनाच अक्षता वाटप केल्या जाणार आहेत. या सामूहिक विवाहासाठी जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी, असं आवाहन  धर्मदाय आयुक्त डिगे यांनी केले आहे. एप्रिल आणि मी महिन्यात साडे तीन हजार लग्न होणार आहेत. यासाठी पुण्यात 500 विवाहांची नोंदणी झाली आहे. याशिवाय गडचिरोली 100, लातूर 100, हिंगोलीत 100 नोंदणी झाली आहेत.

अनेक धार्मिक संस्थांमध्ये आलेला निधी हा बँकेत मुदत ठेवींच्या नावे पडून आहेत. हा निधी समाजासाठी वापरला पाहिजे. शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की समाज त्यांच्याबरोबर आहे. म्हणून धर्मदाय आयुक्तांनी धार्मिक संस्थांना आवाहन केल्यावर त्यांनीदेखील निधी देण्याचे मान्य केलं.  35 जिल्ह्यात समिती स्थापन होऊन हे सामूहिक विवाह होणार आहेत.

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे  यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget