एक्स्प्लोर
चारधाम यात्रेसाठी निघालेल्या नाशिकमधील भाविकांच्या बसचा अपघात, चार ठार, अनेकजण गंभीर
नाशिकहून चारधामला निघालेल्या सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसला काल रात्री 10 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.
नाशिक : नाशिकहून चारधामला निघालेल्या सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसला काल रात्री 10 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या बसमध्ये एकूण होते 50 प्रवासी होते. उज्जैनहून चित्रकूटला जात असताना विदिशा-सागर रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस तीन वेळा उलटली. दरम्यान ती बस रस्त्याजवळच्या नाल्यात पडता-पडता थोडक्यात वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नाशिकमधील 50 भाविक 9 जून रोजी सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसने एक महिन्याच्या तीर्थ यात्रेसाठी निघाले होते. परंतु यात्रेच्या चौथ्याच दिवशी बसचा मोठा अपघात झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement