शिंदे गटाच्या 'एक्झिट प्लॅन'मध्ये बदल; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार, सूत्रांची माहिती
एकनाथ शिंदे यांचा गट आज गुवाहाटीवरून गोव्याला रवाना होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विशेष विमान गुवाहाटील पोहोचणार आहे. त्यानंतर हे सर्व आमदार रात्री गोव्यात पोहोचणार आहेत .
Maharashtra Political Crisis : गेले नऊ दिवस गुवाहाटी मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा मुक्काम आता गोव्यात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या गुवाहाटी 'एक्झिट प्लॅन' तयार असून आज दुपारीच गोव्याला रवाना होणार होते. मात्र आता या प्लॅनमध्ये बदल झाला असून सुप्रीम कोर्टातील निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांचा गट आज गुवाहाटीवरून गोव्याला रवाना होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विशेष विमान गुवाहाटील पोहोचणार आहे. त्यानंतर हे सर्व आमदार रात्री गोव्यात पोहोचणार आहेत . एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये 'ताज कन्वेंशन' या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याठिकाणी 71 रुम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. मुंबईपासून जवळ असल्यानं आमदारांना गोव्यात ठेवण्यात येणार आहे.
सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिंदे गटाचे आमदार आज पहिल्यांदाच हॉटेल रॅडिसन बाहेर पडले. आज शिंदे गटाच्या आमदारांनी कडेकोट बंदोबस्तात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. बहुमत चाचणीसाठी गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत.
शिवसेनेतील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा गट सर्व आमदारांसह मुंबईत परतणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी सकाळी दिलीय. बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. बहुमत चाचणीआधी भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आलाय. उद्याच्या विश्वावदर्शक चाचणीच्या तयारी संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच्या बहुमत चाचणीवेळी अडचणी येऊ नयेसाठी भाजपनं विशेष खबरदारी घेतलीय. मुनगंटीवार आणि दरेकर यांच्यावर विधानभवनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संबंधित बातमी :