एक्स्प्लोर
22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं

धुळे/मुंबई: नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून तो धुळ्याचा आहे. धुळ्यातील बोरविहार गावचा, अवघ्या 22 वर्षांचा तरणाबांड चंदू, 2012 मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाला. दोनच महिन्यांपूर्वी त्याने राष्ट्रीय रायफल्स जॉईन केली होती. मात्र काल पाकिस्तानने त्याला पकडल्याचं वृत्त आलं आणि धुळ्यासह संपूर्ण देशावर काळजीची लाट पसरली. चंदूचा मोठा भाऊ भूषण चव्हाण हा सुद्धा मिलिट्रीतच आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंट, जामनगर गुजरातमध्ये कार्यरत आहे.
लहानपणीच आई-वडिलांचा मृत्यू चंदू चव्हाण लहान असतानाच त्याचा डोक्यावरुन आई-वडील छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालन-पोषण आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. चंदू चव्हाणला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं. आजीचं पार्थिव गुजरातच्या जामनगरहून धुळ्यातील मूळगाव बोरविहीर इथं आणलं जाणार आहे. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोण आहे चंदू चव्हाण? चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा आहे. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाला होता. तर 22 वर्षीय चंदूने दोन महिन्यांपूर्वीच त्याने राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदूचा मोठा भाऊ भूषण हा देखील मिलिट्रीमध्ये आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. संबंधित बातम्या : पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू
लहानपणीच आई-वडिलांचा मृत्यू चंदू चव्हाण लहान असतानाच त्याचा डोक्यावरुन आई-वडील छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालन-पोषण आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. चंदू चव्हाणला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं. आजीचं पार्थिव गुजरातच्या जामनगरहून धुळ्यातील मूळगाव बोरविहीर इथं आणलं जाणार आहे. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोण आहे चंदू चव्हाण? चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा आहे. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाला होता. तर 22 वर्षीय चंदूने दोन महिन्यांपूर्वीच त्याने राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदूचा मोठा भाऊ भूषण हा देखील मिलिट्रीमध्ये आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. संबंधित बातम्या : पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं
मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?
भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार
फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!
फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
आणखी वाचा























