एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : औरंगजेबचा उदो-उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं; उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेचं प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे. 

Chandrashekhar Bawankule On Uddhhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhhav Thackeray) कोकणातल्या सभेत केली. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो-उदो करण्यापेक्षा रामराम करणं हे कधीही चांगलंच आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे. 

फक्त मतं मिळविण्यासाठी कोकणची आठवण -  चंद्रशेखर बावनकुळे 

सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण आल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले. कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात. तर देवेंद्रजी आणि राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणीमाणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणीमाणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

सिंधुदुर्ग- रत्नागिरीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले की, आजही आपण भूत पाहिला की सर्वप्रथम राम राम म्हणतो. तसेच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम राम म्हणू लागलेत, असे ठाकरे म्हणाले होते. यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget