एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : 'राहुल गांधींच्या मुंबईतील सभेआधीच काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपत प्रवेश'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधीनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे. त्यांची यात्रा जसं जसं शिवाजी पार्कजवळ येईल, तसं तसं काँग्रेस नेते पक्ष सोडतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule : एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली. तर दुसरीकडे नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर असून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधीनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे. म्हणून ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज आहे. या प्रवासात राहुल गांधींना गिफ्ट काय मिळणार तर काँग्रेसचे (Congress) नेते पक्ष सोडणार आहेत. राहुल गांधींची यात्रा जसं जसं शिवाजी पार्कजवळ येईल, तसं तसं काँग्रेस नेते पक्ष सोडतील. काँग्रेस कमजोर झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

राहुल गांधी हे काँग्रेस डुबाओ नेते

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे लिस्ट आली आहे. पद्माकर वळवी हे नेते आहेत त्यांनी माझी भेट घेतली आहे. आज नंदुरबारमध्ये राहुल गांधी आहेत आणि त्यांचे नेते मला भेटायला येतात यातून कळतं कांग्रेसमध्ये काय सुरु आहे.  राहुल गांधी हे काँग्रेस डुबाओ नेते आहेत.  राहुल गांधी हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात. काँग्रेसचे हे नेहमी संभ्रमाचं राजकारण करत आलंय. राहुल गांधींच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. 

फडणवीसांबद्दल बोलून संभ्रम पसरवण्याचं काम

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका करत आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्रजींनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. एकमताने मराठा आरक्षणाला पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केल. मराठा समाजाने सुद्धा हे समजून घेतले आहे. फडणवीसांबद्दल बोलून संभ्रम पसरवण्याचं काही लोक काम करत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

मित्रपक्षांवर कुठेही अन्याय होणार नाही

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections 2024) भाजपकडून (BJP) मित्रपक्षांवर अन्याय सुरु आहे, अशी चर्चा रंगली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, मित्रपक्षांवर कुठेही अन्याय होणार नाही. अन्याय होईल अशी कुठलीही गोष्ट भाजप करणार नाही. लवकरच भाजपकडून जागावाटप जाहीर होईल. येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा 

इकडे भारत जोडो यात्रा गावात आली, तिकडे नंदुरबारचा बडा काँग्रेस नेता भाजपमध्ये!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
Embed widget