एक्स्प्लोर
ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, जनता दरबारातच अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
वाशिम : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. काल (18 एप्रिल) त्यांनी वाशिमच्या वीज वितरण कार्यालयाच्या प्रांगणात 'जनता दरबार' आयोजित केला. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली.
जनता दरबारात तब्बल 200 तक्रारी आल्या. ज्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी अधिक होत्या. पैसे दिल्याशिवाय महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत नाही, असा आरोप यावेळी अनेकांनी केला.
त्यानंतर तक्रारींवर कारवाई करत तीन अधिकारी आणि एक वरिष्ठ लिपिकाला नोटीस देऊन त्यांची तातडीने गडचिरोलीला बदली केली, तर 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, चारही अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करा, अशी सूचना ऊर्जामंत्र्यांनीच तक्रारदारांना केली. ऊर्जामंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement