एक्स्प्लोर
VIDEO : आणि ताडोबातील वाघोबाने मजुरांचा डबा पळवला...
टिफीन पळवणारा हा तारा वाघिणीच्या छावा सोशल मीडिया यूझर्सच्या चर्चेचा विषय आहे.

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ म्हणजे अवघ्या वन्यजीवप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय. वाघ तसा मांसाहारी, मात्र वाघोबाने चक्क मजुरांचा डबा पळवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ हा प्रसंग पाहायला मिळत आहे. टिफीन पळवणारा हा तारा वाघिणीच्या छावा सोशल मीडिया यूझर्सच्या चर्चेचा विषय आहे. ताडोबात सध्या हंगामी वनमजूर वेगवेगळ्या ठिकाणी गवत कापण्याच्या कामात व्यस्त आहेत. या कामासाठी आलेल्या मजुरांचे न्याहारीचे डबे जंगलातील एका ठिकाणी ठेवले होते. मजूर कामात व्यस्त असताना इथे आलेल्या एका वाघोबाने यापैकी एक डबा उचलून न्याहाळून पाहिला. माणसाचे हात लागलेल्या वस्तूंपासून एरवी दूर राहणाऱ्या वाघोबाला जाम भूक लागली असावी, म्हणून त्याने डब्याची पिशवी उत्सुकतेपोटी उचलून पाहिली. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























