तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाची झडप; सासू सुनेसह एकीचा मृत्यू, चंद्रपुरात भीतीचे वातावरण
Tiger Attack Chandrapur: वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर आढळले तिघींचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Chandrapur: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना घडलीय. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या. दुपार झाली तरी महिला घरी परत न आल्याने शोध घेण्यात आला. वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघींचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Tiger Attack)
मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश, कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृत महिलांची नावं आहेत. सर्व मृतक मेंढा-माल येथील रहिवासी, वनविभागाने मौका पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी सिंदेवाहीला रवाना करण्यात आले. वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शोध सुरू आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी 3 लोकांचा जीव जाण्याची जिल्ह्यातील किंवा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.
तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या महिलांना वाघाचा हल्ला
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल या गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 9 मे 2025 रोजी गावातील काही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळच्या सुमारास गावालगतच्या जंगलात गेल्या होत्या. बीडी बनवण्यासाठी लागणाऱ्या तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिला दुपार झाली तरी परतच आल्या नसल्याचं लक्षात आल्यानंतर महिलांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी चिंता व्यक्त करत शोध घेण्यास सुरुवात केली.
शोधमोहीमेदरम्यान जंगलात काही अंतरावर या तिघींचे मृतदेह आढळून आले. त्या तिघी महिलांवर वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहांवर गंभीर स्वरूपाचे पंजा आणि दातांचे घाव आढळले. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांचे मृतदेह आढळल्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्याबरोबर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी सिंदेवाही येथे रवाना केले. विशेष म्हणजे, एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू होण्याची ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगतात. वनविभागाने घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावले असून, हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा:
बीडजवळ भीषण अपघात, कारची लक्झरी बसला धडक; 15 वर्षीय मुलासह वडील ठार






















