एक्स्प्लोर

प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर असेल तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार नाही, ठाकरे गटाचा निर्णय,  काँग्रेसपुढं आव्हान 

प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर असेल तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार नाही अशी अट स्थानिक उबाठा पदाधिकाऱ्यांनी घातली आहे.

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेमुळं प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक उबाठा पदाधिकाऱ्यांनी अशी अट टाकली आहे, की प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर असेल तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार नाही. काँग्रेसकडून धानोरकर गटाच्या चार नगरसेवकांनी महापौर पदासाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर, उपमहापौर पदाला घेऊन काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष संपलेला दिसत असला तरी काँग्रेसला आपला महापौर बनवू शकेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

सध्या काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक 

सध्या काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक आहेत. स्थानिक विकास आघाडीचे 3 नगरसेवक, एमएमएमचा 1 व बसपा 1 असे मिळून 32 नगरसेवक असल्याचा दावा आहे. मात्र उबाठा व स्थानिक विकास आघाडी ही स्वतः महापौर पदाच्या शर्यतीत आहे. काँग्रेस हाय कमांडने काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सोपवली असून प्रदेश नेतृत्वाची भिस्त विजय वडेट्टीवार यांच्यावर आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रपुरतील सत्तास्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घटताना दिसत आहेअशातच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी (Chandrapur Mayor) काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे

10 फेब्रुवारी रोजी होणार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रपुरतील सत्तास्थापनेसंबधी मोठी अपडेट समोर आली आहे. विभागीय आयुक्त यांनी चंद्रपूर महापालिकेतील (Chandrapur Municipal Corporation) काही नगरसेवकांची पडताळणी पूर्ण केली नाही, त्यामुळे काँग्रेसचे (Congress) काही नगरसेवक महापौरपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरणार नाही, असा आरोप केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) गटाने त्या संदर्भात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करत विभागीय आयुक्तांवर आरोपही केले आहे. मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व 66 नगरसेवकांची पडताळणी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आधीच पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चंद्रपूर महापालिका आयुक्तांना सर्व 66 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाल्या संदर्भात सूचनाही या आधीच देण्यात आली आहे. त्यामुळे आज सर्व 66 नगरसेवक महापौर उपमहापौर पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पात्र आहेत. तसेच सर्व 66 नगरसेवक 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी ही पात्र असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)

एकूण नगरसेवक 66 

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

भाजप – 23

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

महत्वाच्या बातम्या:

Chandrapur Mayor : चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; किंगमेकर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल; शेवटच्या क्षणी मोठी खेळी?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

Embed widget