एक्स्प्लोर
सुनेला तिसरी मुलगी झाल्याचा राग, आजीकडून नातीची हत्या
चिमुकलीच्या हत्येप्रकरणी 60 वर्षीय जनाबाई राठोडला अटक करण्यात आली आहे
चंद्रपूर : सुनेला तिसरीही मुलगीच झाल्यानं आजीनेच आपल्या 27 दिवसांच्या नातीची हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चिमुकलीच्या हत्येप्रकरणी 60 वर्षीय जनाबाई राठोडला अटक करण्यात आली आहे. सोमलगुडा गावातल्या जनाबाई यांच्या सुनेला काही दिवसांपूर्वी तिसरी मुलगी झाली. ही नवजात बालिका अचानक राहत्या घरातून बेपत्ता झाली. बालिकेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांच्या तपासात राठोड कुटुंबियांच्या घरामागे असलेल्या कापसाच्या ढिगाऱ्याखाली चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर घरातल्या लोकांची कसून चौकशी केल्यावर आजीनेच नातीची हत्या केल्याचं समोर आलं. आरोपी आजीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement