एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chandrapur Crime: चंद्रपुरात मनसे नेत्यावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या, शहरात तणाव, उपचारासाठी नागपूरला हलवले
दिवसाढवळ्या मनसे जिल्हाध्यक्षाला गोळ्या झाडल्याने शहरात तणावाचा वातावरण आहे. चंद्रपूरातील गजबज असणाऱ्या रघुवंशी व्यापार संकूलात घटली घटना
![Chandrapur Crime: चंद्रपुरात मनसे नेत्यावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या, शहरात तणाव, उपचारासाठी नागपूरला हलवले Chandrapur Crime MNC district leader Aman Andhewar shot by unkonwn person Chandrapur Crime: चंद्रपुरात मनसे नेत्यावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या, शहरात तणाव, उपचारासाठी नागपूरला हलवले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/67f701801e0641ec713bfe5b1e05038817200916105251063_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
chandrapur crime
Chandrapur crime: चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरात मनसे नेत्यावर एका अज्ञात युवकाने दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. अमन अंधेवार या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे.
पाठीत मोठी जखम झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. शहरातील गजबजलेल्या रघुवंशी व्यापार संकुल परिसरात लिफ्ट जवळ गोळ्या झाडण्यात आल्याने या परिसरात मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट दिली असून हल्ल्या मागचे कारण आणि हल्लेखोर युवकाचा तपास सुरू आहे. पूर्व वैमनस्यातूनही घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion