एक्स्प्लोर
धक्कादायक...! चंद्रपुरातील मृतकाचा सरकारी लॅबमधील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह तर खाजगी लॅबमधील पॉझिटिव्ह
नागपुरात मृत्यू झालेल्या चंद्रपूरच्या कोरोना संशयितांच्या चाचणी निष्कर्षाचा घोळ समोर आला आहे. सरकारी प्रयोगशाळेत काढलेला अहवाल निगेटिव्ह, मात्र नागपुरातील खाजगी डॉक्टरने मुंबईतील खाजगी लॅबमध्ये पाठवलेले नमुने पॉझिटिव्ह आले

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील एका 58 वर्षीय मृतक व्यक्तीच्या कोरोना चाचणी बाबत धक्कादायक पेच निर्माण झाला आहे. हा पेच आहे सरकारी प्रयोगशाळेचा रिपोर्ट खरा मानायचा की खाजगी प्रयोगशाळेचा याबाबतचा. 30 मार्चला या व्यक्तीचा नागपुरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. या व्यक्तीला श्वसन संस्थेशी संबंधित आजार असल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने घेण्यात आले.
सरकारी यंत्रणेने घेतलेल्या आणि सरकारी प्रयोगशाळेत तपासलेल्या स्त्राव चाचणीत त्या व्यक्तीला कोरोना नसल्याचा रिपोर्ट आला. मात्र नागपूरच्या ज्या खाजगी रूग्णालयात तो मेयो आधी दाखल होता त्या रुग्णालयाने देखील 28 मार्चला घशातील नमुने मुंबईच्या खाजगी प्रयोगशाळेत पाठवले होते. धक्कादायक म्हणजे हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
Coronavirus | देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे 65 टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव
काल मुंबईच्या खाजगी प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर सरकारी यंत्रणेने हा अहवाल मान्य करण्यास नकार दिला आहे. मात्र काळजी म्हणून या मृतकाच्या कुटुंबातील 5 सदस्य आणि उपचार करणारे चंद्रपुरातील फॅमिली डॉक्टर यांचे स्त्राव नमुने घेत 6 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी प्रयोगशाळेची चाचणी खरी की खाजगी लॅबमधील खरी असा अजब पेच निर्माण झाला आहे.
कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस
दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. खाजगी लॅबचे नमूने अधिकृत नाहीत. सरकारी आकडेच अधिकृत आहेत. तरीही आपण सर्व काळजी घेत आहोत. नागपूरच्या खाजगी रुग्णालयाला देखील नोटीस दिली गेल्याचे खेमणार यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















