(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1 मार्चपर्यंत 'या' 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता, तर 'या' भागात गारपीट होण्याची शक्यता
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कधी ढगाळ वातवरण होत आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कधी ढगाळ वातवरण होत आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारी ते 1 मार्च (बुधवार-शुक्रवार) असे 3 दिवस खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 10 जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत जेष्ठे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे. जाणवत आहे. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा 5 जिल्ह्यात व लगतच्या परिसरात आजपासून 1 मार्चपर्यंत असे 3 दिवस गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता
मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यात आज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च (बुधवार- शनिवार) असे 4 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. बुधवार आणि गुरुवार 28 आणि 29 फेब्रुवारीला 2 दिवस मराठवाडयात गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
कोकण व विदर्भ
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 1 आणि 2 मार्च असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तर मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात आज व उद्या बुधवार आणि गुरुवार 28 - 29 फेब्रुवारी असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे. विदर्भ व कोकणात गारपीटीची शक्यता जाणवत नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यातील शेतकरी चिंतेत
दरम्यान, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण, गेल्या दोन दिवसांत राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेलं नाही. पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पावसाआधीच योग्य त्या उपायोजना करणं गरेजचं आहे.
महत्वाच्या बातम्या: