एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना आता केंद्राकडून अपेक्षा; ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या राज्यात

राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुजपुंजी असून त्यांना अधिक मदतीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आता केंद्राकडूनच अपेक्षा आहेत.

मुंबई : क्यार वादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी 5 सदस्यीय केंद्रीय पथक उद्या (21 नोव्हेंबर)महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्‍टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. तर याचा फटका राज्यातील 1 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे. राज्य सरकारनं 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एका शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आलेले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्‍टरी 6,800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13,500, फळबागांसाठी प्रति हेक्टरी 18,000 रुपये हेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे. या अवकाळी पावसाचा फटका सगळ्यात जास्त औरंगाबाद विभागाला बसलेला असून त्याखालोखाल अमरावती आणि नाशिक या दोन विभागात मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि त्यानंतर कापूस या पिकाला बसलेला आहे. 22 नोव्हेंबरला या पथकांसमोर औरंगाबाद, अमरावती आणि नाशिकमध्ये प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होणार आहे. हे अधिकारी करणार पाहणी :- 1)औरंगाबाद विभाग - डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन 2)अमरावती आणि नागपूर विभाग - डॉ. आर.पी. सिंग 3)नाशिक विभाग - दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्रा सत्तास्थापनेच्या तिढ्यात शेतकरी दुर्लक्षित - राज्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. मात्र, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मदतीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी केली होती. यावर राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्‍टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी 8 हजारांची प्रतिहेक्‍टरी मदत; तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र, राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून हेक्टरी 25 हजार मदत जाहीर करावी, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली होती. त्यामुळं उद्या येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. संबंधित बातम्या - नागपुरात नुकसानीची पाहणी करताना शरद पवारांचं गडकरी प्रेम...! पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर मच्छीमार ही संकटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी Farmer Help | राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्यपालांकडून मदतीची घोषणा | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget