एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पाच दिवसात निर्णय नाही झाला तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला होता. राजभवनावर पोहचण्याअगोदरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षेचं कारण देत मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी बच्चू कडू यांना नोटीस पाठवली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अडवल्यानंतर बच्चू कडू  यांनी आयनॉक्स थिएटर मित्तल टॉवरसमोर आंदोलन केले. मोर्चात शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. सोयाबीन, सडलेले कांदे रस्त्यावर फेकून  शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाच दिवसात निर्णय नाही झाला तर आम्ही  पुढच्या वेळी काहीही न सांगता थेट राजभवनावरच पोहचणार असल्याचे 'एबीपी माझा'शी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले.  सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. राज्यपालांनी राज्यात किमान दौरा करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना 25000 रूपयाची मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. Bacchu Kadu Protest | ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आंदोलनानंतर आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात | मुंबई | ABP Majha स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, राज्यात सरकार नाही मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार? राज्यपालांकडे काही हक्कच नसतील तर त्यांनी सुत्रं हातात कशाला घ्यायची ? राज्यपालांनी फक्त राजभवनात बसून राहायचं का ? ते काय स्वर्गातून आले आहेत का? राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहणं गरजेचं आहे. राज्यपालांना प्रशासकीय अधिकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे अपेक्षित आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चावर दडपशाही करण्यात आली. किसान सभा या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ फोटो सेशन करत आहेत. पर्यटनाला यावं अशा थाटात दौरे करत आहेत. सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे विसरून जात आहेत. राजकीय नेत्यांच्या या संतापजनक दिखाऊपणाचाही किसान सभा निषेध व्यक्त करत आहे. मदत जाहीर करण्यात आणखी दिरंगाई झाल्यास सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेत राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget