एक्स्प्लोर

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा अपघात टळला, चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान रुळावर रचले होते मोठे दगड

Central Railway : चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान रुळावर मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा मोठा अपघात होण्याची शक्यता होता.

मुंबई : मध्ये रेल्वेचा (Central Railway) पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळला असल्याचं निर्दशनास आलं. चिंचवड (Chinchwad) ते आकुर्डी (Aakurdi) स्थानकावर रुळावर (Railway Track) मोठे दगड रचून ठेवल्याची बाब समोर आलीये. पण हे दगड अद्याप कोणी रुळावर ठेवले याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे मोठ्या घातपाताची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे. काहीच दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ज्या रुळावरुन जाणार होती, त्या रुळावर देखील दगड-धोंडे ठेवले होते. 

नेमकं काय घडलं ?

चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेचा मेंटेनन्स स्टाफ पेट्रोलिंग करिता गेला होता. त्यावेळी या रुळावर एकावर एक दगड रचून ठेवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ही बाब लक्षात येताच तातडीने त्यांनी ते दगड बाजूला केले. त्यामुळे एक मोठा घातपात होताहोता टळला. चिंचवड वरून आकुर्डीकडे येणाऱ्या रेल्वे रुळावर हे दगड ठेवण्यात आले होते. पण सुदैवानं पेट्रोलिंग करताना ही बाब लक्षात आल्यानं दगड लगेचच बाजूला करण्यात आले. 

वंदे भारत एक्सप्रेसच्या रुळावर रचले होते दगड

काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसच्या रुळावर देखील अशाच प्रकारचे दगड आणि धोंडे ठेवण्यात आले होते. यावेळी उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला होता. लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळे सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वे रुळावर मोठी दगडे आणि इतर गोष्टी दिसल्यानंतर त्याने तातडीने रेल्वे थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती जीरआरपीला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

लोको पायलटने वाचवले प्रवाशांचे प्राण

उदयपूर ते जयपूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सोमवारी चित्तोडगड जिल्ह्यातील सोनियाना गांगरार येथे पोहोचली. तेव्हा लोको पायलटला ट्रॅकवर दगड दिसले. दगड पाहिल्यानंतर पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले. यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. समाजकंटकांनी रुळांवर मोठमोठे दगड, बार टाकले होते. गाडी वेळेत थांबवली नसती तर रुळावरून घसरण्याची शक्यता होती. या अपघातामागे कोणाचे षडयंत्र आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा : 

VIDEO : ट्रॅकवर रॉड उभे केले, मध्ये दगड रचले, सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget