CBIकडून पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सहा तास चौकशी, देशमुख प्रकरणात परमबीर सिंहना धमकावल्याचा आरोप
Anil Deshmukh Case Update : सीबीआयने मुंबई नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जबाब नोंदवला आहे. शुक्रवारी अनिल देशमुख प्रकरणात पांडे यांची सीबीआयकडून सुमारे 6 तास चौकशी करण्यात आली.
Anil Deshmukh Case Update : सीबीआयने मुंबई नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जबाब नोंदवला आहे. शुक्रवारी संजय पांडे यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. येथे त्यांची जवळपास 6 तास चौकशी करण्यात आली. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करुन देशमुखांविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी प्रभाव टाकण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहरक्षक विभागात बदली झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिले होते, ज्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे.
त्यानंतर, परमबीर सिंह यांनी आपल्याविरुद्धचा तपास मागे घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, जे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, यांचे संभाषण उघड केले होते. ज्यामध्ये कथितपणे संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले.
सीबीआयने त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते की, संजय पांडे आणि परमबीर सिंह यांच्यात झालेल्या संभाषणातून महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय यंत्रणांच्या तपासापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरू असलेला तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करावा, अशी विनंती करणारी याचिका महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली असता सीबीआयने हे उत्तर दिले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Trending : उज्जैनचा मजूर बनला करोडपती, आयकर अधिकारीही आश्चर्यचकित, 'हे' आहे कारण
- संतापजनक! एक वर्षाच्या चिमुकलीला जीवंत पुरलं... निर्दयी बापाचं कृत्य, भांडण लेकराच्या जीवावर..
- Beed Crime News : चोरांचा पोलिसांनाच हिसका, घरातून 1 लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल लंपास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha