एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंद्राणी मुखर्जीला जामीन देण्यास सीबीआय कोर्टाचा नकार

सध्या इंद्राणी भायखळा येथील तुरुंगात असून सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आपल्या आरोग्याला असलेला धोका आहे. ही बाब लक्षात घेत 45 दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात यावा अशी विनंती इंद्राणीने या याचिकेतून केली होती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआयच्या न्यायालयानं फेटाळून लावला. साल 2012 मध्ये घडलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच शीनाची आई इंद्राणी मुखर्जीने याआधीही अनेकवेळा जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केले होते. मात्र, प्रत्येक वेळेस प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता कोरोनाच्या कारणाखाली इंद्राणीने अंतरिम जामिनासाठी सीबीआय विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सध्या इंद्राणी भायखळा येथील तुरुंगात असून सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आपल्या आरोग्याला असलेला धोका आहे. ही बाब लक्षात घेत 45 दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात यावा अशी विनंती इंद्राणीने या याचिकेतून केली होती. तसेच आपल्याला मेंदूशी निगडित आजार असून त्यावर औषधोपचारही सुरू आहेत. न्यायालयात सुरू असलेली खटल्यावरील सुनावणी कोरोनामुळे पुन्हा कधी सुरू होईल ते निश्चितपणे सांगता येणार नाही. तसेच हत्येच्या खटल्यातील आरोपीही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अंतरिम जामिनासाठी पात्र ठरतो. हा हायकोर्टाच्या स्तरीय समितीचा (एचपीसी) दाखलाही इंद्राणीनं या याचिकेत दिला होता. मात्र सीबीायनं याला विरोध दर्शविला. मुखर्जी या परदेशी नागरिक असून हायकोर्टाच्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार त्या अंतरिम जामिनास पात्र ठरत नसल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. तसेच इंद्राणी मुखर्जी या कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रस्त नाहीत त्यामुळे त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा तितकासा धोका संभवत नाही, असंही सीबीआयनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर कारागृहातील सर्व कैद्यांना योग्य उपचार पद्धती आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा चालक शामवर रायला अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. इंद्राणीनं आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपली मुलगी शीनाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप यासर्वांवर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट,  अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रियाLebanon Pager Blast Special Report : हल्ला डेंजर, फुटले पेजर...लेबनॉनमध्ये काय घडलं?Pune Ganesh Visarjan Special Report : 29 तासांच्या विसर्जन मिरवणुका, पुण्यातील रस्ते दोन दिवस ठप्प

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Embed widget