एक्स्प्लोर
मांजर मारहाण वाद : खासदार वंदना चव्हाणांचा अब्रू नुकसानीचा दावा

पुणे : मांजर मारहाणीचा कोर्टात गेलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आता अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहेत. खोट्या आरोपांबद्दल विजय नावडीकर यांच्यावर, 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं, खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटलं आहे.
चितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण
काय आहे प्रकरण? वंदना चव्हाण या पुण्यातील सदाशिव पेठेत यशोधन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विजय नावडीकर यांनी सात- आठ मांजर पाळली आहेत. ती मांजरं सोसायटीतील कोणाच्याही घरात घुसतात. वंदना चव्हाण यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्रमाबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु बंदोबस्त झाला नाही. एक दिवस एक मांजर त्यांच्या घरात शिरलं असता, त्या मांजराला सळईने मारहान करण्यात आली. त्यामुळे नावडीकर चीडले. मांजर अपंग झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. दोन वर्षे खटला चालवला. आता न्यायालयाकडून चव्हाणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. वंदना चव्हाण, त्यांचे पती आणि घरातील इतरांविरुद्ध खटला सुरु आहे. मांजराला वंदना चव्हाण यांनी मारलं की त्यांच्या घरातील इतर कोणी, हे माहीत नाही, परंतु हा खटला संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांविरोधात आहे. या प्रकाराविरोधात आता वंदान चव्हाण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. संबंधित बातमीचितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण
मांजराला मारहाण, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांना कोर्टाची नोटीस
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























