भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, जिवे मारण्याची धमकी दिल्याची महिलेकडून तक्रार
जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या महिलेने केला आहे.
मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप करत संबंधित महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिला आयोगाकडून दखल
या घटनेनंतर पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याने संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई कण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले होते. या बरोबरच गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए चाचणी करावी आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
गणेश नाईक यांच्या आरोपांचा बाण शिवसेनेच्या वर्मी? नगरविकास विभागाकडून 'तो' निर्णय रद्द
नवी मुंबईत गणेश नाईक आणि भाजपला मोठा धक्का, लवकरच नऊ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार