एक्स्प्लोर
तिलारी घाटात कार दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी घाटात कार दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील पाचजणांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी घाटात कार दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील पाचजणांचाही जागीच मृत्यू झाला आहे. बेळगावहून व्हॅगन आर कारमधून पाच तरुण वर्षापर्यटनासाठी आले होते. चंदगड तालुक्यातील कोदाळी येथील सूर्यास्त पॉईंट म्हणजेच लष्कर पॉईंटजवळ आले असता तिथल्या गवतावर कारचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे कार दरीत कोसळून बेळगावच्या 5 युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण एका पतसंस्थेत काम करत असल्याची माहिती आहे.ृ अपघातग्रस्त तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते चंदगडमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत . तिलारी घाट हा वेड्यावाकड्या वळणांमुळे आणि अरुंद रस्त्यामुळे धोकादायक समजला जातो. तसंच हे ठिकाण धोकादायक असून दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा























