एक्स्प्लोर
Advertisement
मराठा आरक्षण रद्द करा, इम्तियाज जलील यांची हायकोर्टात याचिका
राज्य सरकारनं दिलेल्या मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा याबाबतच्या अहवालाला आव्हान देत मराठा आरक्षण रद्द करा अशी विनंती करणारी याचिका इम्तियाज जलील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई : मराठा आरक्षण तातडीनं रद्द करा, अशा मागणीची याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. यासोबतच मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्याचीही मागणीही त्यांनी केली आहे.
राज्य सरकारनं दिलेल्या मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा याबाबतच्या अहवालाला आव्हान देत मराठा आरक्षण रद्द करा अशी विनंती करणारी याचिका इम्तियाज जलील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना तो डावलला जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचं आणि यांतील काही ठराविक घटकांचं जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावं असंही या याचिकेत म्हटलेलं आहे.
अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवरही मुख्य याचिकेसोबत 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम पक्षाचे नेते असून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement