एक्स्प्लोर

... तर अन्य आरक्षण हटवण्याची हिंमत गडकरींमध्ये आहे का? हर्षवर्धन जाधव

आरक्षणासाठी रोज तरुण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी तातडीने निर्णय घेणं गरजेचं असताना गडकरी यांचं विधान विषयांतर करण्यासाठी असल्याचं ते म्हणाले.

अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाटत असेल आरक्षणाचा नोकरीत फायदा नाही, तर ओबीसी, एससी, एसटी यांचं आरक्षण काढून घेण्याची हिंमत आहे का? असा सवाल शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. औरंगाबादहून पुण्याकडे बैठकीला जात असताना अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर हर्षवर्धन काही वेळ थांबले असता त्यांनी गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. आरक्षणासाठी रोज तरुण आत्महत्या करत आहेत.  अशा वेळी तातडीने निर्णय घेणं गरजेचं असताना गडकरी यांचं विधान विषयांतर करण्यासाठी असल्याचं ते म्हणाले. राजकीय व्होट बँकेच्या नादात प्रत्येक पक्षाने जाती-जातीत वितुष्ट निर्माण केलंय आणि हे वितुष्ट संपवण्यासाठी वेगळा पक्ष निर्माण करण्याची गरज असल्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार हर्षवर्धन जाधव यांनी केला. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई आहेत. गडकरी काय म्हणाले? जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असं मत गडकरींनी व्यक्त केलं. गडकरी औरंगाबादेत बोलत होते. आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचं काम जबाबदार पक्षांनी करु नये, असंही गडकरींनी आवाहन केलं. तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget