मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार, बस अडवून कंडक्टरला मारहाण
मराठीत बोललो नाही म्हणून 20 हून अधिक जणांनी बस थांबवून मारहाण केल्याचा आरोप बस कंडक्टरने (Bus conductor) केला आहे.

बेळगाव : मराठीत बोललो नाही म्हणून 20 हून अधिक जणांनी बस थांबवून मारहाण केल्याचा आरोप बस कंडक्टरने (Bus conductor) केला आहे. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावच्या बाळेकुंद्री खुर्द (Balekundri Khurd) इथं ही घटना घडली आहे. मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार असं कंडक्टरने सांगितल्यामुळं ही मारहाण केली आहे.
नेमका काय घडला प्रकार?
बसमधून एक तरुण आणि तरुणी मध्यवर्ती बस स्थानकातून बाळेकुंद्री खुर्द येथे निघाले होते. यावेळी तरुणीने दोघांचे तिकीट मागितले. यावेळी दुसरा प्रवासी कोण म्हणून कंडक्टरने विचारले असता तरुणीने तरुणाकडे बोट दाखवले. यावेळी कन्नडमधून बोलणाऱ्या कंडक्टरला मराठीत बोला असे तरुणाने सांगितले. यावेळी कंडक्टरने मला मराठी येत नाही, मी कन्नडमध्येच बोलणार असे उत्तर दिले. त्यानंतर तरुणाने तुला आमचे गाव येऊ दे मग सांगतो असे उत्तर दिले. बस बाळेकुंद्री खुर्द येथे येताच 50 हूण अधिक लोकांनी बस रस्त्यात अडवली. नंतर बसमध्ये 20 हून अधिक जणांनी चढून कंडक्टरला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या बस ड्रायव्हरला देखील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल
दपम्यान, या घटनेनंतर कंडक्टरने जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. तसेच याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मराठी भाषिकांना जाणून बुजून टार्गेट केले जात असल्याचा आरोप देखील केला आहे. मराठीत बोललो नाही म्हणून 20 हून अधिक जणांनी बस थांबवून मारहाण केल्याचा आरोप बस कंडक्टरने केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Police : गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण प्रकरण, पोलिस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, 'गजा मारणेचा भाचा...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
